तो केवळ राम होता
लिहायचे होते आज शब्दाविना काही
कागदावर उतरला तो केवळ राम होता
निघालो होतो मार्गी अंधारात रात्री
प्रकाशाने उजळवणारा तो केवळ राम होता
निर्जन आयुष्यात गर्दीच्या जवळ नव्हते कोणी
तुमच्या रुपी येणारा तो केवळ राम होता
क्रमण होते काट्याकुट्यांनी भरल्या पायी
मायेने फुंकरणारा तो केवळ राम होता
काय बोललो असे आज मी याच वेळी
भूतकाळी नव्हे तर पुढेही तो केवळ राम होता
श्री. स्वानंद नंदकुमार मराठे,
पुणे






Be First to Comment