Press "Enter" to skip to content

कोलाड-खांब परिसरात तासंतास विज गायब

महावितरण कंपनीचा मनमानी कारभार : ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण

सिटी बेल लाइव्ह / गोवे कोलाड (विश्वास निकम )

रोहा तालुक्यातील कोलाड-खांब परिसरात वीज तासंतास दररोज गायब होत असल्याने महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांनकडून एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक वेळा वृत्त पत्रातुन अवाज उठवुन महावितरण कंपनीकडून वारंवार विज पुरवठा खंडित केला जात असुन यामुळे ऐन पावसाळ्यात जिवनमानावर विपरीत परिणाम होत आहे.चक्रीवादळ नंतर सर्वत्र झपाट्याने ताबतोब पंधरा ते वीस दिवसात वीज पुरवठा सुरु केला मात्र तद्नंतर आजतागत वीज वारंवार काही काळ विज पुरवठा खंडित केला जात असल्याने याविषयी या संदर्भात कोलाड येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात फोन केला असता फोन ही उचलला जात नाही.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली तीन महिने महावितरण कंपनीचा कर्मचारी मीटरची रिडींग घेण्यासाठी आला नाही यामुळे वीज ग्राहकांना ऍव्हरेज प्रमाणे बिल आकारली.ग्रामीण भागातील रोजंदारी करणाऱ्या नागरिकांसह व्यवसायिक लोकांना तर याचा फटका मोठया प्रमाणात बसलेला दिसून आला कारण कोरोनामुळे तीन महिने व्यवसाय बंद होता परंतु एव्हरेज प्रमाणे त्यांची बिले अवाच्या सवा आलेली आहेत.यात भरीत भर म्हणुन निसर्ग चक्रीवादळा मुळे पंधरा ते वीस दिवस विज पुरवठा बंद होता.परंतु लाईट बिलात भरमसाट वाढ करण्यात आली आहे.

लॉक डाऊनमुळे तीन महिन्याचा लाईट बिल माफ करावा अशी अनेक स्थरावरून विविध संस्थेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली परंतु यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे समोर येत आहे. तसेच याशिवाय विज वितरण कंपनीने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कमिशनतत्वावर वीजबिल वितरण(वाटप) करण्यासाठी कमी पगारातकामगारांची नेमणूक करण्यात आले असून त्यांना विज बिलाप्रमाणे एक बिलावर किंवा अतिरिक्त रक्कम कमिशन ठरवून दिलेली आहे, परंतु हे कामगार आपली इतर कामे करताना दिसत आहेत.

म्हणजेच ते आपल्या सवडीनुसार वीज ग्राहकांना लाईट बिल देण्याचे काम करत आहेत,परिणामी त्यांच्या या भोंगळ व मनमानी कारभारामुळे वीज बिलभरण्याची तारखेच्या एक-दोन दिवस आगोदर ग्राहकाला वीजबिल मिळत आहे.त्यातच शनिवार रविवार अथवा सरकारी सुट्टी आली की त्याचा फटका ग्राहक वर्गाला बसत असून भुर्दंड म्हणून अतिरिक्त रक्कम भरावी लागत आहे. याशिवाय वीज बिल भरण्यास विलंब झाला तर त्या ग्राहकाचा वीज कनेक्शन बंद करण्याचा पोबारा करतात जणू काही लाखो करोडोचा वीज बिल थकीत केला आहे.परंतु तासंनतास वीज गायब होत असतांना चौकशीसाठी फोन केला असता यांचा फोन बंद केला जातो.यामुळे महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.