सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार)
रोहे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस अधिक वाढू लागला असून,आज नव्याने ०९ रुग्ण पाँझिटिव्ह सापडले आहेत तर तालुक्याची एकूण रूग्ण संख्या ही ४९५ वर पोहोचली आहे.
रोह्यात व ग्रामीण भागात दररोज पाँझीटिव्ह रूग्ण सापडू लागल्याने शहरासह ग्रामीण भागात भितीदायक वातावरण पसरले आहे.तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने ९ रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या ४९५ वर पोहोचली आहे.सध्या १४० रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात ११ जण मयत झाले आहेत.तर ३४४ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.तरी घरीच राहा सुरक्षित रहा व आपल्याबरोबर आपल्या परिवाराचेही संरक्षण करा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.






Be First to Comment