आई
आई म्हणजे आई
तिला मोगरा म्हणून की जाई
फक्त तिच्या असण्यातच
वातावरण सुगंधी होई
आई म्हणजे आई
जशी भाबडी विठाई
निरपेक्ष प्रेम करणारी
हजार चुका पदरी घेई
आई म्हणजे आई
कधी कठोरही होई
सत्य सन्मार्ग आणि संस्कार
यासाठी आग्रही होई
अनघा अंबपकर, नवीन पनवेल
आई
आई म्हणजे आई
तिला मोगरा म्हणून की जाई
फक्त तिच्या असण्यातच
वातावरण सुगंधी होई
आई म्हणजे आई
जशी भाबडी विठाई
निरपेक्ष प्रेम करणारी
हजार चुका पदरी घेई
आई म्हणजे आई
कधी कठोरही होई
सत्य सन्मार्ग आणि संस्कार
यासाठी आग्रही होई
अनघा अंबपकर, नवीन पनवेल
Be First to Comment