खालापूर येथे पहल संस्थेच्या माध्यमातून नवीन स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे – संजय गायकवाड |
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील खालापूर येथे पहल संस्थेच्या माध्यमातून नवीन स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते संपन्न झाले.

खालापूर तालुक्यात नव्याने स्थापन होणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामुळे तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यातून तरुणांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नवीन कोर्सेस शिकवले जाणार आहेत,आणि त्याचा फायदा तरुण पिढीला पुढील कालावधीत नोकरी मिळण्याकरिता होणार आहे.

या उदघाटनप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, भरत भाई शहा
उपविभागीय अधिकारी अजित नैराळे,तहसिलदार आयुब तांबोळी, खालापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विभुते, खालापूर मुख्याधिकारी रश्मी चव्हाण
सुरेखा भणगे, शिवानी जंगम, खालापूर तालुका प्रमुख संतोष विचारे
शहर प्रमुख उमेश गावंड, अंकुश भारद्वाज,सर्व खालापूर ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते.










Be First to Comment