सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आपटा दाभोळ आदीवासीवाडी आणि काळीवली आदीवासीवाडीच्या डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त केला आहे.
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपटा मौजे दाभोळ आदीवासीवाडीतील राम धर्मां वाघे (वय 40)याने गैरकायदा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु आपल्या ताबे कब्जात बाळगली होती.यात 2000 हजार रुपये किंमतीचा दोन सफेद रंगाचे 20 लिटर क्षमतेचे त्यास फिरकीचे बूच असलेले प्लास्टिक कॅन त्यात 20 लिटर हातभट्टीची गावठी दारू तसेच 1000 किमतीचा सफेद प्लास्टिक कॅनमध्ये 10 लिटर हातभट्टीची गावठी दारू व स्टीलचा ग्लास असा 5005 रुपये किंमतीचा माल कारवाईंत मिळून आला.तसेच मौजे काळीवली आदीवासीवाडी येथील चंदर वाघे (वय 40) याने गैरफायदा विनापरवाना गावठी हातभट्टीची तयार दारु ,तयार साहित्य व रसायन असे एकूण 23030 किमतीचा माल आपल्या ताबेकब्जात बाळगून पोलिसांची चाहूल लागताच माल तेथेच टाकून पळून गेला.

यावेळी रसायनी पोलिसांना 12400 रुपये किंमतीचे एकूण निळ्या रंगाचे दोन प्लास्टिकच्या ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे दारु तयार करण्याचे तांबड्या रंगाचे उग्र वास येत असलेला मिश्रीत द्रव्य एक लिटरप्रमाणे तीस रुपये किंमतीच्या ड्रमसह तसेच 6100 रुपये किंमतीची दोनशे लिटर क्षमतेची पत्र्याची टाकीत दारु बनविण्याचे साहित्य तसेच 3100 रुपयांचा शंभर लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम तसेच 620 रुपये किंमतीचा वीस लिटर क्षमतेचा प्लास्टिक कॅन दारु साहित्यासह आढळून आला.
सदर प्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात म.प्रो.अॅक्ट 65 खंड (इ)क.फ.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलिस ठाण्याच्या नव्याने पोलिस निरीक्षक म्हणून कैलास डोंगरे यांनी चार्जं घेताच परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तपासातून गुन्ह्यांची उकल काढण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांची काम करण्याची पद्धत आगळीवेगळी असल्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात असल्याने रसायनीकर समाधान व्यक्त करत आहेत.







Be First to Comment