पेण तालुक्यातील शिहू विभागात महिला आघाडीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम
सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत) #
शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.(27) सोमवारी पेण तालुक्यातील शिहू विभाग व परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माळरान पठार, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके यावेळी म्हणाल्या की महाराष्ट्राला उद्धव साहेब ठाकरे यांच्यासारखे संयमी, अभ्यासू, विकासात्मक दृष्टी असलेले प्रगतशील कणखर नेतृत्व लाभले आहे. आता महाराष्ट्र्र विकासाच्या वेगळ्या वाटेवर आहे. त्यांच्या कार्याला आमच्या भरभरून शुभेच्छा. निसर्ग चक्री वादळाने संपूर्ण जिल्ह्यासह कोकणातील लहान मोठे, जुने नवीन वृक्ष कोलमडून पडले. निसर्ग व पर्यावरणाची प्रचंड हानी झाली. त्यामुळे अधिकाधिक वृक्ष लागवड
करून कोकणचे नैसर्गिक गतवैभव व सौदर्य पूर्ववत व्हावे यासाठी प्रत्येकाने
वृक्षलागवड करून योगदान दिले पाहिजे. केवळ वृक्ष लागवड न करता त्याचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प आम्ही केला आहे . व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या असल्याचे संघटिका दर्शना जवके यांनी सांगितले. यावेळी शिहू विभाग संपर्क संघटिका सौ. मंजुळा म्हात्रे, शिहू विभाग संघटिका सौ. सरिता पाटील, उपविभाग संघटिका सौ.सुषमा वारगे, बेणसे शाखा संघटिका प्रणाली कोळी, झोतिरपाडा शाखा संघटिका सोनम पाटील, शिहू शाखा संघटिका सारिका कुथें, कुहिरे शाखा संघटिका प्रभावती जवके, कुहिरे माजी सरपंच मनीषा जवके, शालिनी शिगवण, स्नेहलता खंडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्तीत होत्या.








Be First to Comment