Press "Enter" to skip to content

दिघोडे गाव १००% लसीकरण करण्या चे मानस !

दिघोडे ग्रामस्थानां लसीकरण उपलब्ध केल्या मुळे ग्रामस्थानी मानले ग्रामपंचायत चे आभार

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

कोरोनाचा भविष्यकाळातील तीसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.सदरची बाब लक्षात घेऊन ही लस आपल्या गावातच मिळावी म्हणुन ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच तथा विद्यमान सदस्य श्री.प्रफुल्ल अरुण पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील नागरीकांसाठी कोविल्डशीलचे डोस उपलब्ध करण्यात आले होते.

यामध्ये पहिला डोस..178 आणि दुसरा डोस..22 ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य व सदस्या तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच तालूका आरोग्य अधिकारी उरणचे डॉ.दर्शना म्हात्रे वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र कोप्रोली डॉ.भोसले, श्री.निलेश झावरे त्यांचे सहकारी या सर्वांचे सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे सरपंच व सदस्य च्या वतीने मनापासुन आभार मानले.
तसेच १८+ वयोगटावरील नागरिकांचे लवकरच १००% लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले.

त्यामुळे दिघोडे येथेच नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करुन ग्रामपंचायतीला धन्यवाद देत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.