सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | नागोठणे |
शिहू ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड नागोठणे तर्फे कोविड १९ लसीकरण दि १९ सप्टेंबर रोजी प्राथमिक शाळा शिहू व ग्रामपंचायत कार्यालय शिहू येथे मोफत सुरु करण्यात आले आहे.
शिहू ग्रामपंचायत ही लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असून ४ गावे व २ आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. लसीकरणा पासून एकही नागरिक वंचित राहू नये म्हणून ही मोहीम राबवत असल्याचे प्रतिपादन रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी केले. ते पुढे म्हणाले की आदिवासी वड्यांवरील अति दुर्गम भागातील व खेडोपाड्यातील नागरिक लसीकरनापासून वंचित राहणार नाही या कडे आदिक लक्ष केंद्रित करून वरवठने ते शिहू रिलायन्स कंपनी परिसरातील नागरिकांचे १००% लसीकरण केले जाईल या साठी रिलायन्स प्रशासन प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन केले.
या लसीकरण मोहिमेसाठी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड नागोठणेचे वरिष्ट अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, अध्यक्ष शशांक गोयल, उपाध्यक्ष चेतन वालंज, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, ( कॉपोरेट अफेअर्स ) डॉ. प्रशांत बारदोलाई, आणि टीमचे ग्रामपंचायत सरपंच पल्लवी भोईर, युवानेते प्रसाद भोईर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी आभार मानले.
कोविड कालावधी मधील रिलायन्सच्या या सामाजिक बांधिलकीच सर्वत्र कौतुक होत आहे.








Be First to Comment