Press "Enter" to skip to content

चौक मध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच, सिसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

चौक बाजारपेठेत पुन्हा चोरांनी धुमाकूळ घातला असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चार किरकोळ घरफोडी केल्या आहेत.

चौक बाजारपेठ व नागरी वस्ती असलेले शहर असून अनेक व्यापारी-यांची दुकाने राहत्या घरीच आहेत,दाट वस्तीत हे शहर असून व्यापारी यांच्याबरोबर ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने रहात आहेत,चौक शहरीकरणाकडे वाटचाल करीत असून याठिकाणी कायमस्वरूपी व भाड्याने रहावयास येणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका देशीदारू व बार फोडला होता. त्यांनतर चौक बाजारपेठ मधील एकाच रात्री पाच दुकाने फोडली होती. मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी कोणीही तयार होत नाही. चोर फक्त पैसे चोरण्याच्या उद्देशाने येत आहेत. कोणत्याही घरेलू वस्तूला हात लावत नाहीत तर दुकानातील वस्तू देखील घेऊन जात नाही.

चौक बाजारपेठ मध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून चोर सीसीटीव्ही कॅमेरे मध्य कैद झाले आहेत. मात्र संपूर्ण चेहऱ्याला कपडा गुंडाळून दिसतात त्यामुळे संशय येणाऱ्या व्यक्तीला देखील चौकशी ला घेणे कठीण झाले आहे. पूर्वी चौक बाजारपेठ मध्ये वॉचमन होते. काही व्यापारी सुरक्षिततेवर खर्च करण्यासाठी तयार नसल्याने वॉचमन यांचा पगार देणे शक्य न झाल्याने त्यांनी काम सोडले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला त्रास होत असून पोलिसांना सहकार्य करण्यास देखील स्थानिकांची चालढकल दिसते.

गेली काही वर्षे ग्रुप ग्रामपंचायत चौक कडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत असून ग्रामपंचायत देखील चालढकल करताना दिसत आहे.स्वतः पोलीसच ही यंत्रणा कार्यान्वित करतील असे दिसत असून खालापूर वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते ही संकल्पना पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.