Press "Enter" to skip to content

सुधागड तालुक्यातील ढोकळेवाडी शाळेतील शिक्षकाची आत्महत्या ; तालुक्यात उडाली खळबळ 

अनेक दिवस होते मानसिक तणावात


सिटी बेल | पाली/रायगड | धम्मशील सावंत |

सुधागड तालुक्यातील ढोकळेवाडी शाळेतील शिक्षक अमोल कांबळे (वय 37) यांनी  शाळेत  गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण सुधागड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक कांबळे हे अनेक दिवस  मानसिक तणावात होते. अचानक त्यांनी आत्महत्येसारखे  टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. या घटनेची पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

   

गावातील एक ग्रामस्थाने कांबळे यांच्या मोटारसायकलला चावी पाहून त्यांना शाळेत पाहण्यास गेला असता कांबळे गळफास लावलेल्या स्थितीत दिसले. ग्रामस्थांनी लगेच पोलिसांना ही घटना कळवली. 

   

अमोल कांबळे यांच्या पच्छात पत्नी, एक लहान मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह त्यांचे मूळ गाव वडजा तालुका वाशीम जिल्हा उस्मानाबाद येथे नेण्यात आला. कांबळे यांच्यावर मानसिक आरोग्य संदर्भात उपचार सुरू होते.  अशी माहिती त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दिली. त्यांच्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे हे करीत आहेत. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.