Press "Enter" to skip to content

खारगाव ग्रा. पंचायत हद्दीमध्ये कोरोना लसिकरण

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील खारगाव ग्रा. पंचायत हद्दीतील खारी,काजुवाडी, गुरूनगर व गौळवाडी येथे रोहे ग्रामीण उपजिल्हा रूग्णालय यांच्या सहकार्याने व ग्रा. पंचायत खारगाव यांच्या वतीने कोरोना लसीकरण मोहिम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.

या मोहीमेतंर्गत कोविडशिल्डचा पहिला डोस खारी , काजुवाडी, गुरूनगर आणि गौलवाडी येथील २२० लाभार्थीना देण्यात आला.तर दुसरा डोस ८८ लाभार्थ्यांना देण्यात आला.यावेळी सौ नंदा शेळके, आशा सेविका, नितीन मालुसरे ,सतेज अपनकर ,शैलेश खिरीट,सुधीर मेहेतर,नंदा पाटील, वरणकर आदींसह गावातील मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

खारगाव ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या प्रयत्नातून व प्रा.आरोग्य केंद्र आंबेवाडी यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने राबविण्यात आलेल्या कोरोना लसिकरण मोहिमेबद्दल रहिवासी वर्गाकडून स्वागत करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.