Press "Enter" to skip to content

मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात पुणे येथील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

सिटी बेल| रेवदंडा | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्ह्यात मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात आज दिनांक 18 सप्टेंबर2021 रोजी पलट्टू सूत्रधार (वय-३५ वर्षे) आणि सुरजित नस्कर (वय- २५ वर्षे) दोघेही सध्या राहणार श्री गुरु गोल्ड ,सोन्या मारुती चौक पुणे ,मूळ राहणार पश्चिम बंगाल यांचा येथील मृत्यू झाला आहे.

मयत हे त्याच्या मित्रासमवेत काशीद येथे फिरण्यासाठी आले होते. सुरजित नस्कर व पलट्टू सूत्रधार हे त्याच्या मित्रासमवेत समुद्री स्नानासाठी
काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेला होता .मात्र समुद्रात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन साठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.