रिलायन्सच्या कार्यक्षेत्रातील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही : जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांचे सुतोवाच
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
शासनाची कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर रिलायन्स व्यवस्थापनाने आपले कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, ठेकेदार, कंत्राटी कामगार यांचे लसीकरण करून आपला पहिला टप्पा पूर्ण केला. त्यानंतर इतर काही ग्रामपंचायत हद्दीत ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. आता वरवठणे ग्रामपंचायत हद्दीत दोन दिवसांत ही लसीकरण मोहीम पूर्ण करण्यात येईल. नंतर लोकसंख्येने मोठ्या असलेल्या शिहू भागातही ही लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. अशाप्रकारे रिलायन्स कंपनीच्या कार्यक्षेत्रातील एकही नागरिक कोविड प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी व्यवस्थापनाकडून घेतली जाईल असे स्पष्ट प्रतिपादन रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी केले.
नागोठण्याजवळील वरवठणे ग्रामपंचायत हद्दितील १८ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण रिलायन्सच्या सहकार्याने वरवठणे ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक शाळेत सुरु करण्यात आले यावेळी धनावडे बोलत होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे व ग्रामपंचायत वरवठणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या कोविड लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तानाजी नारनवर, रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, वरवठणे सरपंच ॠतुजा म्हात्रे, उपसरपंच विजय पाटील, सदस्य गणपत ल. म्हात्रे, रेवती पाटील, पुष्पा म्हात्रे, रोशन दाभाडे, बापजी पवार, सुरेखा म्हात्रे, कु. ॠतुजा करजेकर, रिलायन्सचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. प्रशांत बरदोलीया, डाॅ. भानुप्रताप दुबे, डाॅ. प्रितेश मोहन, डॉ. सुशांत जाधव, डॉ. गजानन ससाणे, जनार्दन मुंडे, ग्रामसेविका देवता भंडारे, रिलायन्सचे वैद्यकीय कर्मचारी दिनेश चौधरी, ललिता गायकवाड, मेघा दाहत, मेघना भोईर, सोनाली जाधव, निकिता काळे, शुभम जमदाडे, पोलिस शिपाई सत्यवान पिंगळे आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे यांच्याकडून ही लसीकरण मोहिम सुरु करण्यात आल्याबद्दल रिलायन्स व्यवस्थापन व रिलायन्सच्या वैद्यकिय पथकाचे वरवठणे ग्रामपंचायतीचे सदस्य गणपत ल. म्हात्रे यांनी आभार मानले.








Be First to Comment