Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लसीकरण शिबिर संपन्न

201 जणांनी घेतला लाभ

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लसीकरण शिबीर संपन्न झाले, या मध्ये 201 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आणि कर्जत मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पुढाकाराने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री कपालेश्वर मंदिरात 10 दिवसांच्या गणरायाची स्थापना केली आहे, मंडळाचा सामाजिक उपक्रम म्हणून हे शिबिर आयोजित केले होते. कोव्हीशिल्ड पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला.

श्री कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करणात आले होते. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी शिबिरास भेट दिली.डॉ.संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली रुपेश लाड, पूनम जगडुळे, रुपाली कांबळे, शाहीन मुजावर, संकेत पाटील यांनी लसीकरण केले. त्यांना जयदीप देऊसकर, अभिजीत मराठे,संदीप भोईर,अमित मराठे,आशिष गोखले,रोनक कोठारी, निलेश परदेशी,योगेश लोवंशी, पंकज शहा,सदानंद जोशी, किशोर वैद्य,सोहम जोशी,मंगेश जोशी, मिलिंद खंडागळे, दत्ता गुरव,अनिल शहा आदी कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. कोव्हीशिड चा पहिला डोस व दुसरा डोस अश्या 201 जणांनी डोस घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.