Press "Enter" to skip to content

स्वतःच्या आई चे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मुलास कर्जत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चोरीचे दागिने घेणा-या सोनारांना पडले महागात

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे भिसेगाव येथे राहणाऱ्या एका महिलेने आपले दागिने चोरीला गेले असल्याची तक्रार कर्जत पोलिस ठाण्यामध्ये दाखल केली होती, हे दागिने त्या महिलेच्या स्वतःच्या मुलाने चोरल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले, अशा या चोरट्या मुला सह त्याचे 5 साथीदारांना बेड्या ठोकण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.

कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत भिसेगाव येथील उदय नगर येथे राहणाऱ्या अर्चना श्रीकांत मोरे या महिलेच्या राहत्या घरातील कपाटामधील 44 हजार 100 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना 2 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2021 च्या सुमारास घडली असल्याची तक्रार त्या महिलेने कर्जत पोलीस ठाण्यांमध्ये दिली, कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.क्र.248/2021 भा. द. वि. कलम 380 अन्वये नोंद करण्यात आली.

कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार अशोक राठोड, पोलीस अंमलदार सुभाष चौधरी, पोलीस अंमलदार गणेश पाटील, आणि पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे हे अधिक तपास करीत होते.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस नाईक अशोक राठोड यांना त्या महिलेचा मुलगा कृष्ण मोरे यास चौकशीकामी ताब्यात घेऊन गुन्हया बाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पोलिसांनी कृष्ण मोरे यास विश्वास घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मीच गुन्हा केल्याचे कबूल केले, कपाटातील सोन्याचे दागिने हे त्याचे 2 मित्र यांच्या मदतीने कर्जत शहरातील 3 सोनार दुकानदारांना विकल्याचे कबूल केले.

सदर सदर गुन्ह्यातील 3 सोनार दुकानदार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण सोन्याचे दागिने विकत घेतल्याचे कबूल केले, त्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या, कानातल्या साखळी, फुले, झुमके असा एकूण 44 हजार 100 रुपयाचा माल 100% जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले. सदर गुन्ह्यातील एकूण 6 आरोपींना कर्जत पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.