Press "Enter" to skip to content

जुना शेवा शंकर मंदिरातील दान पेंटींची चोरी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण तालुक्यातील जुना शेवा गावातील सुप्रसिद्ध शंकर मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शंकर मंदिराची देखभाल संतोष शिवराम दर्णे हे करीत असत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १४ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारीत मंदिरातील स्टील व लोखंडी अशा दोन दान पेट्या चोरून नेल्याचे १५ सप्टेंबर रोजी दर्णे यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती न्हावा शेवा पोलीस स्टेशनला देऊन तक्रार दाखल केली. स्टील व लोखंडी या दोन दान पेटीतील अंदाजे १२ हजारावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास सब इन्सपेक्टर निलेश फुले हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.