Press "Enter" to skip to content

बुडणाऱ्या महीलांना वाचवणाऱ्या तरुणांना साई देवस्थान वहाळ चा
साई देवदूत पुरस्कार

सिटी बेल | साई संस्थान वहाळ |

दि. 11 सप्टेंबर 2021 दिवस ऋषिपंचमी ठिकाण उरण ऋषीपंचमीचा दिवस म्हटला हे स्त्रियांसाठी एक व्रत या दिवशी महिला गावा जवळील तळ्यामध्ये किंवा नदीमध्ये स्नान करण्यासाठी जात असतात. असेच पिरकोन येथील तलावात स्नान करण्यासाठी तीन महिला व दोन मुली जात असताना यातील एका मुलीचा पाय घसरून ती तळ्यात पडली तिला वाचविण्याकरिता एका महिलेने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोहता येत नसून सुद्धा पाण्यात तिचा जीव वाचवण्यासाठी उडी घेतली.

महीलांचे प्राण वाचविणारे “देवदूत” प्रणित पाटील व अधिकार पाटील

परंतु त्या दोघीही त्या तळ्यामध्ये बुडत होत्या, असेच एकमेकांना वाचविण्यासाठी एकूण तीन महिला व दोन मुली या तळ्यात पडल्या परंतु एकालाही पोहता येत नसल्याने हळूहळू त्या पाण्यात बुडून तळ्याच्या तळाशी जात होत्या. सुदैवाने त्याचवेळी बाजूनेच रस्त्यावरून जाणाऱ्या वशेणी येथील दोन तरुण प्रणित पाटील व अधिकार पाटील पिरकोन गावात दर्शनाकरिता जात असताना सदर महिला व मुली त्यांना बुडताना दिसल्या.

हे पाहताच त्यांनी स्वतःच्या मोटर सायकलवरून उडी मारत दोघांनीही त्यात तळ्यामध्ये झेप घेतली व त्या तळ्यातील तळाशी जात असलेल्या सदर तीन महिला व दोन मुली यांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुखरूपपणे बाहेर काढत यांना जीवदान दिले.‌

या दोन तरुणांनी केलेल्या कार्यामुळे श्री साई देवस्थान साईनगर वहाळ तर्फे त्यांचा “साई देवदूत” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

याप्रसंगी श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का.पाटील, श्री साई देवस्थानचे विश्वस्त मो. का. मढवी गुरुजी ,माजी राजिप सदस्य सौ. पार्वती ताई पाटील, राजू मुंबईकर इतर मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.