नागाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे
रस्त्यांचे झाले नाले
शेकापक्षाचे जेष्ठ नेते काका पाटील यांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी केली ग्रामपंचायती कडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / रमेश थळी / उरण #
पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नागांव मांडल आळी रहिवाशांच्या अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले असल्याने सकाळी अनेकांची तारांबळ उडाली आहे.
या विषयी सविस्तर माहिती देताना काका पाटील म्हणाले की, नागांव हद्दीत घराचे बांधकाम करण्यासाठी एका व्यक्तीला बांधकामासाठी ज्या नाल्यातुन नागांव मांडल आळी गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा होतो त्या नाल्यात पाईप टाकून तात्पुरता माल नेण्यासाठी परवानगी दिली होती. पावसाळा सुरू होण्याच्या आधी नाल्यातुन हे पाईप काढण्याची जबाबदारी घर बाधंनार्या व्यक्तीची होती. परंतु त्या व्यक्तीने पाईप नाल्यातुन काढला नसल्याने आज पावसाचे पाणी ग्रामस्तांच्या घरात घुसले. हा प्रकार नागांव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप शेकापचे जेष्ठ नेते काका पाटील यांनी केला आहे.






Be First to Comment