Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद प्रभाग -7 मध्ये लसीकरण शिबिर संपन्न : 194 जणांनी घेतला लाभ

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगरपरिषद प्रभाग क्रमांक -7 मध्ये विठ्ठलनगर परिसर येथे लसीकरण शिबीर संपन्न झाले, या मध्ये 194 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आणि कर्जत नगरपरिषदेच्या पुढाकाराने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींबकर यांनी हे शिबिर आयोजित केले होते.कोव्हीशिल्ड पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला.

समाज मंदिराच्या सभागृहात मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करणात आले होते.नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप नेते दिपक बेहेरे यांनी शिबिरास भेट दिली.डॉ.संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली रुपेश लाड, पूनम जगडुळे, रुपाली कांबळे, शाहीन मुजावर, संकेत पाटील, अनिता मक्कु, करण काळे यांनी लसीकरण केले. त्यांना प्रविण पाटेकर, स्वप्नील काकडे, युगांत रणदिवे, अलोक डाळिंबकर, अनिकेत रणदिवे, पप्पू वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली.कोव्हीशिड चा पहिला डोस व दुसरा डोस अश्या 194 जणांनी डोस घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.