सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
आज गणराया व गौरींचे पारंपारिक पद्धतीने कर्जत शहरातील उल्हास नदीच्या गणेश घाटांवर जाऊन विसर्जन केले. तर तालुक्यातील गौरी गणपतींचे विसर्जन गावांजवळच्या नद्या, तलाव व ओढ्यांमध्ये करण्यात आले. आज तालुक्यात एकूण 5983 गणरायांचे व 2609 गौरींचे विसर्जन करण्यात आले.
कर्जतकरांनी पारंपारिक पद्धतीने पूर्वी सारखेच उल्हास नदीच्या घाटावर जाऊन विसर्जन केले. यावेळी सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे भाविकांमध्ये उत्साह नव्हता. मुद्रे परिसरातील भाविकांनी त्याभागात वाहणाऱ्या उल्हास नदीत, भिसेगाव व गुंडगे भागातील भाविकांनी कर्जत शहरातील गणेश घाटावर, दहिवली येथील भाविकांनी दहिवली येथील गणेश घाटावर आणि आकुर्ले येथील भाविकांनी आकुर्ले येथील गणेश घाटावर जाऊन गौरी गणपतीचे विसर्जन केले.
तालुक्यात कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 सार्वजनिक 3830 खाजगी व 1347 गौरी, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2083 खाजगी व 1252 गौरींचे तर माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 सार्वजनिक, 64 खाजगी व 12 गौरींचे असे एकूण 5983 गणरायांचे व 2610 गौरींचे विसर्जन करण्यात आले.
Be First to Comment