कोकणचा गणपती
कोकणचा गणपती लय भारी
वाजत गाजत येते स्वारी
दूर्वा फुलांची आरास भारी
करंज्या नेव्हर्यांची रेलचेल सारी
बाळगोपाळ फोडतात फटाके दारी
शेजारी पाजारी सारे दर्शना येती घरी
रात्री भजनात असतात लाडू करंज्या अन् उसळीची तरी
सुस्वरूप भजनाने आबाळ वृद्ध भारावून जाती…
निरोपही गणरायाचा लय भारी
सगळ्यांच्या डोळा पाणी येई
आरती जय घोषात सारे निरोप देती
पुढच्या वर्षी गणराया लवकर येण्याच्या आशेपोटी….
कोकणचा गणपती लय भारी
वर्षभर जागते ही आठवण न्यारी…
संदिप तांबे, माहीम, मुंबई







Be First to Comment