Press "Enter" to skip to content

कर्जत पोलिसांची जुगार अड्डयावर कारवाई : 1 लाख 11 हजार 340 रुपयांचा ऐवज जप्त

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्डयावर कर्जत पोलिसांनी कारवाई केली आहे, 13 जणांवर ही कारवाई केली असून त्यांचे कडून 1 लाख 11 हजार 340 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे, कारवाई बद्दल त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे,

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुगाराचा अड्डा सुरू आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12 सप्टेंबर 2021 रोजी 07:55 वा. सुमारास मौजे – पाटील आळी येथे कर्जत पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस हवालदार सुभाष पाटील, पोलिस नाईक सचिन नरूटे, पोलिस शिपाई भुषण चौधरी, पोलिस शिपाई आश्रुबा बेंद्रे, पोलिस शिपाई गणेश पाटील यांनी धाड टाकली.पोलिसांनी या प्रकरणी 13 जणांवर कारवाई केली आहे. हे सर्व कर्जत तालुक्यातील मुद्रे येथील राहणारे आहेत. सदर गुन्ह्यातील एकूण 1 लाख 11 हजार 340/- रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 245/2021 जुगार अधिनियम, 1867, कलम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार सुभाष पाटील हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.