Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद प्रभाग 5 मध्ये लसीकरण शिबिर संपन्न : 265 जणांनी घेतला लाभ

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगरपरिषद प्रभाग क्रमांक -5 मध्ये मुद्रे येथे लसीकरण शिबीर संपन्न झाले या मध्ये 265 जणांनी लसीचा लाभ घेतला.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आणि कर्जत नगरपरिषदेच्या पुढाकाराने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्थानिक नगरसेविका संचिता संतोष पाटील यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.कोव्हीशिल्ड पहिला आणि दुसरा देण्यात आला.

नाना मास्तर नगर मुद्रे येथील संचिता संतोष पाटील यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात लसीकरण शिबिराचे आयोजन करणात आले होते. या शिबिरास आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, शिवसेना जिल्हा महिला प्रमुख रेखा ठाकरे, नगरसेविका संचिता पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी उपस्थिती दर्शविली.

लसीकरणासाठी उप जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी, डॉ. गुलाम नविवाला, पूनम जगदाळे तर सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न गुरव, ज्ञानेश्वर कर्णुक, संदीप पाटील यांनी सहकार्य केले. या केंद्रावर 146 पुरुष 119 महिला एकूण 265 नागरिकांनी लसीकरण करून घेतले.त्यामध्ये मध्ये केवळ 6 जणांनी दुसरा डोस घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.