Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये मोटारसायकलची चोरी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड‌ |

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 08 सप्टेंबर 2021 रोजी 2-30 वा. सुमारास मौजे महालक्ष्मी हॉटेल समोर च्या मोकळया जागेत कोणीतरी आज्ञात चोरटयाने कर्जत तालुक्यातील वावे येथे राहणारे फिर्यादी यांची एकूण 15 हजार रुपये किमतीची एक काळया व लाल रंगाची सुपर स्प्लेंडर हीरो कंपनीची तिचा क्रमांक एम एच-46/ए एम 5309 ही मोटार सायकल फिर्यादीची संमतीशिवाय लबाडीचे हेतुने स्वत:चे फायदयाकरीता चोरुन नेली आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 240/2021, भा.द.वि.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार काठे हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.