Press "Enter" to skip to content

माजी नगरसेवक गणेश म्हसकर यांचे हृदयविकाराने निधन

सामाजिक कार्यकर्ता हरपला !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे #

अत्यन्त कमी वयात मेहनतीने व शांत स्वभावाने सामाजिक – राजकीय – व्यापारी क्षेत्रात भरारी घेणारे कर्जत मधील माजी नगरसेवक गणेश म्हसकर यांचे आज हृदयविकाराने दुःखद निधन झाले . कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ते उपचार घेत असताना हि घटना घडली . हि घटना समजताच कर्जतमध्ये मित्रपरिवार , आप्तेष्ट , त्यांचे कुटुंब , तसेच राजकीय क्षेत्रात हळहळ पसरली .
राजकीय क्षेत्रात ते प्रथम शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना पक्षाची कामे तालुक्यात करत असल्याने ग्रामीण भागात त्यांची चांगलीच ओळख होती . नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले . कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सुरेशभाऊ लाड यांनी त्यांना उमेदवारी दिली व ते निवडून आले .नगरसेवक असताना त्यांनी अनेक विकास कामे केली . सामाजिक कार्यात ते स्वताला झोकून काम करत . अनेक संघटनेत त्यांचा मदतीचा हातभार असे . रक्तदान शिबीर , शैक्षणिक क्षेत्रात देखील ते अनेकांना मदत करत असत . स्वकर्तुत्वाने व आपल्या कार्याच्या जोरावर व शांत स्वभावाने ते सर्वांच्याच जवळचे होते . साधे कॉन्ट्रॅक्टर ते बिल्डर असा प्रवास देखील त्यांनी केला . कर्जतमध्ये अनेक प्रभागात त्यांनी इमारत बांधल्या .
कोरोना महामारीत त्यांना त्याची लागण झाली होती , त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता , मात्र उपचारा दरम्यान हृदयविकार आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी मुले असा परिवार आहे . त्यांच्या निधनाची बातमी समजताच कर्जत तालुक्यात हळहळ पसरली .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.