Press "Enter" to skip to content

पोलादपूर येथील स्वामी कवींद्र परमानंद मठात कोविड लसीकरणाचे शिबीर

प्रसाद इंगवले यांची सामाजिक बांधिलकी

सिटी बेल| पोलादपूर | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात मुंबई, पुणे व राज्याच्या अन्य भागातून मोठया संख्येने गणेशभक्त चाकरमान्यांचे सहकुटूंब आगमन झाले असल्याने कोरोना संसर्गाची शक्यता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठया प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणाऱ्या प्रसाद इंगवले यांच्या माध्यमातून केवळ 15 तासांच्या कालावधीत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे ठरले आणि त्यास पोलादपूरकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

यापुढेही गणेशोत्सव काळामध्ये शहरामध्ये लसीकरण करण्यासाठी स्वामी कवींद्र परमानंद मठामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामीण रूग्णालय पोलादपूरच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.भाग्यरेखा पाटील यांनी दिली.

यावेळी स्थानिक माजी नगरसेविका संगिता इंगवले, सहायक अधिक्षक नितीन पाचनर्गे, समन्वयक राजेश वोसावे, परिचारिका अश्विनी चिपळूणकर, बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद इंगवले तसेच प्रमुख पाहुणे पत्रकार शैलेश पालकर आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार शैलेश पालकर यांनी प्रसाद इंगवले यांना गेल्या अनेक वर्षांपासून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये गरजू गरीब रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचा डबा मोफत देण्याची सेवा मनापासून करताना पाहिले. गेल्याचवर्षी त्यांचे आजोबा बाप्पा इंगवले यांचे कोरोना काळात निधन झाल्याने आजचे लसीकरण शिबिर आयोजित करण्यासाठी त्यांचा पुढाकार हा सामाजिक बांधिलकीतून दिसून येत असल्याचे सांगून पोलादपूर तालुक्यातील आबालवृध्द स्त्रीपुरूषांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

दिवसभरामध्ये कोविशिल्डचे पहिले आणि दुसऱ्या डोसचे 100 जणांना लसीकरण तर कोवॅक्सीनचे दुसऱ्या डोसचे 15 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.