
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहा ( नंदकुमार मरवडे)
कोरोना विषयी लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांना समाजात वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जात आहे. हा गँभीर प्रकार असून बाधित रुग्णांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. कोरोना हा एक संकट आहे. संकट समयी सर्व समाज बांधवांनी संघटित होऊन त्यांच्या मदतीसाठी धावत जा. असे सांगत कोरोना रुग्णांवर सामाजिक बहिष्कार टाकू नका कोरोना विषयी सर्वत्र जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत कोकणी डोकटर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वसीम फोफालुणकर यांनी व्यक्त केले.
रोहा अष्टमी मुस्लिम समाज बांधव व कोकणी डोकटर्स असो.च्या संयुक्त विद्यमाने रोहा येथील रेवा शाळेत मोफत आरोग्य तपासणी केंद्राच्या उदघाटन प्रसंगी डॉ. फोफालुनकर बोलत होते. या वेळी रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ.अंकिता खेरकर, डॉ.विश्वनाथ देखमुख, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, डॉ. नाझीम दानन, डॉ.काझीम चोगले, सामाजिक कार्यकर्ते फैसल अलवारे, डॉ. फरीद चिमावकर, आरोग्य सभापती अहमद दर्जी, मौलाना सादिक, मौलाना मसरूल आलम, अकील लंबाते, रियाज शेटे, जुबेर चोगले, कादिर रोगे, आखलाक नाडकर, उस्मान रोहेकर, नदीम सिद्दिक, सलिम चोगले, असिफ करजिकर, इम्तियाज दर्जी, जमीर करजिकर, मुशीर दर्जी, लियाकत सवाल, एजाज वासकर, मुनाफ खोपटकर आदी मान्यवर व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते फित कापून या आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोना रोग घातक नाही परंतु संसर्ग रोग असल्याने मास्क लावणे,अंतर ठेवणे, आणि वेळोवेळी सॅनिटायजरचा वापर केल्याने हा रोग सहजा सहजी जडत नाही. समाजात अनेक प्रकारचे गँभीर गुन्हे करणारे गुन्हेगार उजळ माथ्याने फिरतात परंतु कोरोना बाधित इस्माकडे समाज वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले जात आहे. त्यातून रक्ताच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. नात्यातील माणसे एकमेकांचा तिरस्कार करत आहेत. हा समाजासाठी घातक आणि गँभीर विषय असल्याची खंत डॉ. फोफलुनकर यांनी या प्रसंगी व्यक्त केली. या संस्थेच्या वतीने पनवेल, उरण, महाड,माणगांव, रोहा तालुक्यात आरोग्य तपासणी केंद्र उभारून रुंगणावर मोफत उपचार केले जात आहे तसेच ‘निसर्ग’ चक्रीवादळात आमच्या संस्थेच्या वतीने १२७ गावांना पिण्याचं पाणी पुरवठा देखील केल्याची माहिती डॉ. फोफलुनकर यांनी दिली. समाजाचे आपण काय तरी देणेकरी आहोत या उदात्त हेतूने येथील मुस्लिम समाज बांधव व कोकणी डॉकटर असो. ने सुरू केलेले सामाजिक कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे असे सांगत या उपचार केंद्रामुले लोकांच्या मानातील भीती निश्चितच दूर होईल अशी खात्री डॉ. खेरकर व मुख्याधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आखलाक नाडकर यांनी केले.






Be First to Comment