Press "Enter" to skip to content

कडाव येथील कु.विशाखा राजेंद्र गंगावणे हिची राज्यस्तरीय फ्रि स्टाईल कुस्ती स्पर्धेत निवड

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

जिल्हास्तरीय चाचणी स्पर्धेत कर्जत तालुक्यातील कडाव येथील 18 वर्षीय कु. विशाखा राजेंद्र गंगावणे हिची 53 किलो वजन गटाच्या महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती संघात निवड झाली आहे.

रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, खालापुर तालुका कुस्तीगीर संघ आणि लायन्स क्लब खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय 23 वर्षांच्या आतील मुलामुलींची कुस्ती निवड चाचणी नुकतीच लायन्स क्लब खोपोलीच्या सभागृहात संपन्न झाली. ग्रीको रोमन आणि फ्रि स्टाईल प्रकारच्या कुस्त्या सुसज्ज पद्धतीने खेळल्या गेल्या. सदर जिल्हास्तरीय चाचणी स्पर्धेत कर्जत तालुक्यातील कडाव येथील 18 वर्षीय कु. विशाखा राजेंद्र गंगावणे हिची 53 किलो वजन गटाच्या महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती संघात निवड झाल्याने कडाव परिसरातुन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लहानपणीच वडीलांचे छत्र हरपल्याने अत्यंत खडतर परिस्थितीत तिच्या आईने मोलमजुरी करून मुलांना सांभाळत आहे.तीचे व तिच्या दोन भावंडांचे पालनपोषण केले असुन तिला कुस्ती ह्या खेळात आईने व मोठ्या बहिणीने प्रोत्साहन दिले असे तीने सांगितले. शालेय कुस्ती स्पर्धेसह तिने तालुका व जिल्हास्तरावर अनेकदा कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला आहे. रमेश लोभी, भगवान धुळे, पालांडे सर ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन तिला मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघात तिची निवड झाली असुन इंदापुर येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेत ती सहभाग घेणार आहे.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.