Press "Enter" to skip to content

भिवंडीचा खैरतस्कर रायगड वनविभागाच्या जाळ्यात, कोलाडमध्ये वनविभागाची धडक कामगिरी !

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |

मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड सुपर मार्केट जवळ अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक कोलाड येथे वनअधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडला.

सविस्तर वृत्त असे की, बुधवार दि. १ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भिवंडी येथील पडगा येथून चिपळूण सावर्डे येथे खैर भरून जाणारा ट्रक गाडी नंबर GJ15 – AT 7851 हा कोलाड येथील सुपर मार्केट जवळ वनरक्षक अधिकारी दक्षिण रायगड भरारी पथक प्रमुख ईशांत कांबळी, अजिंक्य कदम,तेजस नरें, प्रविण शिंदे, किशोर पाटील व कोलाड वनविभागाचे कर्मचारी यांनी सापळा रचून पकडले.

यावेळी वाहनचालक नजमुद्दीन याला ताब्यात घेतले असुन अधिक तपास कोलाड वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.