एकाच दिवशी 6 कोरोना रुग्ण सापडले : सुधागडवासीय चिंतेत
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
कोरोनापासून अनेक महिने अलिप्त असलेल्या सुधागड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. रविवारी (दि. 26) एकाच दिवशी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता सुधागड वासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सुधागड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आता 26 वर पोहचली आहे. यातील 10 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आणि 15 जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यातील लॉक डाऊन हटविण्यात आल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळताना दिसत आहे, अशातच कोरोना चा संसर्ग अधिक फैलावण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरीकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी , अधिकाधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.






Be First to Comment