अंगणवाडी उपकेंद्र भाताण येथे कोरोना लसिकरण शिबीराचे आयोजन
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कोरोना महामारीच्या संकटाने अनेकांचे जीवन विस्कळित झाले असून अजूनही कोरोनाचे संकट टळले नसून आणि त्यातही लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी नागरिकांना होणारा मानसिक त्रास लक्षात घेता भाताण- भाताणपाडा व आसपासच्या परिसरातील नागरिकांना लसीकरण मिळावे ह्या हेतूने राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम घेणारे पनवेल पंचायत समिति माजी उपसभापती वसंत काठावले यांच्या पाठपुराव्यामुळे व भाताण ग्रामपंचायत सरपंच सुभाष भोईर व ग्रामपंचायत कमिटीच्या सहकार्याने अंगणवाडी उपकेंद्र भाताण येथे १२० कोविशिल्ड लसींचे नागरिकांना कोरोना लस देण्यात आली.
यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी प्रदीप कांबळे यांच्याहस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी दत्तू हिंदोळे, विस्तार अधिकारी आरोग्य साहाय्यक शरद बडे,पनवेल पंचायत समिती माजी उपसभापती वसंत काठावले, डॉ संदेश गोवारी, डॉ दिलीप गोवारी, डॉ मानसी देशपांडे, सरपंच सुभाष भोईर, उपसरपंच रेश्मा भोईर, माजी उपसरपंच दीपक ठाकुर, माजी उपसरपंच अस्मित काठावले, ग्रामपंचायत सदस्य केशव गायकर, ग्रामपंचायत सदस्य सुनिल सते, अनिल काठावले, माजी सदस्य अरुण पाटील, दत्तात्रय ठाकुर, ग्रामसेविका रजनी माळी, काँग्रेस युवा नेते किरण सते सुभाष पाटील, पवन काठावले तर गावातल महिला तरुण वर्ग मोठया संख्येने हजर होते.








Be First to Comment