Press "Enter" to skip to content

गावठी हातभटटीची दारुची विक्री करणा-या महिलेवर पोलिसांची कारवाई

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी 5:30 वा. सुमारास मौजे, पुलाचीवाडी येथे महिला आरोपी रा. पुलाचीवाडी ता. कर्जत हिने विनापरवाना गैरकायदा गावठी हातभटटीची तयार दारु स्वत:चे ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळुन आली. सदर गुन्ह्यातील एकूण 910/- रुपये गावठी हातभटटीची तयार दारु पोलिसांनी हस्तगत केली आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 232/2021 दारूबंदी अधिनियम, 1949, 65(d),(e),(f)] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक राठोड हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.