गोकुळ सुखावले
आले भरून मेघ हृदयात बासरी वाजे
हळुवार पावलांनी चंद्रकोरीत मथुरा साजे
येणार तूच कान्हा ही खूण अंतरीची
जाईल दूर तम सारा यावी आता प्रचिती
स्वप्नात रंगले सारे नवरंगी मोरपीस
ये उदयास बाळकान्हा जन्माष्टमी मथुरा नरेश
वायु लहरी गोकुळी सुगंधात न्हाहे धरती
गिरकी घेत अनिल तृप्त स्वप्नी मधुरम प्रीती
स्तब्ध सारे गोकुळ सवत्स धेनु हंबरती
अवेळीच फुटे पान्हा क्षीरोदक धरे वरती
वाजती घांगरमाळा पशुपक्षी ही नादावले
दुंदुभी नगारे मंजिऱ्या गुंजनी गोकुळ सुखावले
किती हर्ष भरे अवनी पाहण्यास सुरवर जमले
विसावा मनीचा हृदीचा पुष्प सुगंधी गोकुळ नटले
मध्यरात्री रंग निळा घननीळा श्रावणसरी सह आला
तारणहार घनश्याम सावळा गोकुळी अवतरला.
सौ. सुजाता खरे.







Be First to Comment