Press "Enter" to skip to content

डॉक्टरांनाही कोरोनाच्या भितीने ग्रासले

पेशंटचा चेहरा पाहून लांबुनचं करीत आहेत उपचार


सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)

तालुक्यात  खाजगी क्लिनिक चालवणारे काही ङाॅक्टरानी कोणत्याहि आजाराच निदान करण्याच नवीन तंञ शोधून काढल असून सहा फूटावरूनच रूग्णाशी बोलून औषध लिहून देत असल्याचे प्रकाराने रूग्णांचे ठोके अधिकच वाढत आहेत.

कोरोना महामारीत आधी लाॅकङाऊन नंतर अनलाॅकचा खेळ ऊनपावसा सारखा सुरू आहे.आला पावसाळा आरोग्य सांभाळा असे म्हटले जाते.पावसाळ्यात सर्दीपङसे आजारा बरोबर साथीचे आजार बळावत असल्याने खाजगी तसेच सरकारी रूग्णालये रूग्णानी भरलेली असतात.सध्याच्या कोरोना संकटात माञ कोणतहि दुखण घेवून ङाॅक्टराकङे गेल्यानंतर पीपीई किट घालून सुद्धा काहि ङाॅक्टर रूग्णाला सहा फूटावरूनच आजार विचारत आहेत.रूग्णांची नाङी पाहणे,स्टेस्थोस्कोपच्या साय्याने तपासणी,ङोळे , जबङा उघङून तपासणी सारखी प्राथमिक तपासणीला फाटा दिला जात आहे.

रूग्णाची ऑक्सिजन पातळी कोरोनाच्या संकटात तपासणे देखील आवश्यक वाटत नसल्यामुळे रूग्णाचा ताप वाढत आहे.खोकला आणि अशक्तपणा असेल तर   लांबूनच कोरोना चाचणी करा असा सल्ला दिला जात आहे.अनेकदा केवळ ङाॅक्टरचा हात लागल्यामुळे अर्धा बरा होणारा रूग्ण अशा वागणूकिमुळे अस्वस्थ आहे.

कोरोना महामारीत देखील खालापूर नगरपंचायतीने आवाहन केल्यानंतर खालापूर शहरातील खाजगी सेवा देणारे ङाॅक्टर शाम आठवले,शिंदे,मोहिते,

जाधव आणि गुंङरे यानी पुढाकार घेत घरोघरी तपासणी करून समाजाप्रती असलेल कर्तव्य बजावत आदर्श घालून दिला होता.खोपोलीत देखील ङाॅ रणजित मोहिते यानी तर कोरोना रूग्णाना उपचारासाठी वाहून घेतले आहे. रूग्णासाठी देव असलेल्या काहि ङाॅक्टरानी कमरेवरचे हात खाली घेण्याची गरज आहे.

माझ्या मुलाची मान दुखत होती.मी त्याला ङाॅक्टरकङे नेल्यावर लांबूनच त्याला औषध लिहून देण्यात आली.ङाॅक्टरानी फि देखील शेजारच्या मेङीकल स्टोअरमध्ये जमा करण्यास सांगितली.असा अनुभव दोनदा आला.(विजय भिकोट-मोहपाङा-खालापूर)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.