Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये घरफोडी चोरी, 50 हजार रोख रक्कम पळविली

सिटी बेल| कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगरपरिषद क्षेत्रातील मुद्रे परिसरातील एका घराच्या खिडकीचे ग्रील वाकवून अज्ञात चोरट्यांनी 50 हजार रोख रक्कम पळवली आहे.

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी 11:00 वा ते दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी 11:00 वा. दरम्यान मौजे मुद्रे येथील चैतन्य निवास नानामास्तर नगर सुखम हॉस्पिटलचे समोर फिर्यादी यांची 50,000/- रुपये किंमतीची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे संमतीशीवाय लबाडीच्या हेतुने , ऑफिसचे खिडकिचे ग्रिल वाकवुन, खिडकिची स्लायडींग उघडुन आत प्रवेश करुन घरफोडी चोरी केली.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 231/2021 भा.दं.वि.क. 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार सुभाष पाटील हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.