सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
राज्य सरकारच्या विरुद्ध कर्जत मध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने शंखनाद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात अनेक उपक्रम अनलॉक होत असताना मंदिरे मात्र अद्याप खुली होत नाहीत.एकतर सर्व सामाजिक राजकीय कार्यक्रम सुरू आहेत, बाजार उघडले आहेत.तरीही हिंदुत्वाच्या नावावर मते मागून मुख्यमंत्री झालेले मंदिरे उघडण्यास तयार नाहीत हा श्रद्धेचा विषय तर आहेच परंतु त्यावर मोठे अर्थ चक्र अवलंबून आहे, प्रवासी वाहतूक करणारे ( रिक्षावाले ) हॉटेलवाले, फुलवाले, खेळणीवाले पार्किंग वाले असे अनेक सामाजिक समूह अवलंबुन आहेत.
झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आज दि.30 ऑगस्ट रोजी मंदिरे उघडण्यासाठी कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकातील श्री कपालेश्वर मंदिर समोर टाळ, घंटा, शंख वाजवत ‘मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलायेंगे’ हा नारा देत आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे,शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, परशुराम म्हसे, प्रकाश पालकर, प्रमोद पाटील, मयूर शितोळे, मारुती जगताप, विजय कुलकर्णी,सतीश मुसळे, राहुल कुलकर्णी, रमेश चव्हाण, बिनीता घुमरे, सरस्वती चौधरी, शर्वरी कांबळे, सार्थक घरलुटे,सर्वेश गोगटे,अभिनय खागटे,राजेश ठाणगे, कैलास पाटील, सूर्यकांत गुप्ता हजर होते तर नेरळ येथे
किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुनील गोगटे, सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, संदीप म्हसकर,अरुण नायक, मृणाल खेडकर,वर्षा बोराडे, धनंजय धुळे. हेमंत मेस्त्री, बल्लाळ जोशी, पराग गायकवाड, प्रवीण गायकवाड, बंटी कुलकर्णी, मनोहर भोईर ,भगवान ऐनकर, हसमुख बर्जे, गणेश तरे, केशव तरे उपस्थित होते.
Be First to Comment