Press "Enter" to skip to content

भरधाव डंपरच्या धडकेने मोटार सायकलवरील दोघे तरुण जखमी

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

भरधाव डंपरच्या धडकेने मोटार सायकलवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील गव्हाण बाजूकडील कुंडेवहाळ परिसरात घडली आहे.

मोटार सायकलवरुन चंदन वर्मा (24) व पंकज वर्मा (24) हे दोघे जण हे चालले असताना गव्हाण फाटा बाजूकडून कुंडेवहाळकडे जात असताना एका डंपरने त्यांच्या गाडीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात हे दोघेजण जखमी झाल्याने त्यांना मिलेनियम हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.