Press "Enter" to skip to content

पनवेल शहर पोलिसांनी पकडली ८० लीटर गावठी दारू : एकास अटक

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

गावठी दारुची वाहतूक शेवरलेट या चार चाकी वाहनातून करणार्‍या एका इसमास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गावठी दारुसह गाडी असा मिळून 2,08,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सागर कोटकर (30 रा.शिळ रोड) हा करंजाडे सेक्टर 1 या ठिकाणावरुन त्याच्या ताब्यात असलेली काळ्या रंगाच्या शेरवलेट गाडीतून गावठी दारु घेवून जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच सपोनि गणेश दळवी, निशांत धनवडे, पो.हवा.संजय केरुर, पो.शि.सोनवणे आदींच्या पथकाने सापळा रचून सदर गाडी अडवून तपासणी केली असता त्या गाडीमध्ये पांढर्‍या रंगाच्या गोणीमध्ये प्लॅस्टीकच्या पिशवीत 80 लीटर गावठी दारु आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 65 (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.