सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील प्रा.शाळा देवकान्हे येथे प्रा.आरोग्य केंद्र आंबेवाडी-कोलाड व ग्रा.पं.देवकान्हे यांच्या वतीने कोरोना लसीकरण मोहिम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
या मोहीमेतंर्गत कोविडशिल्डचा पहिला डोस ३० नागरिकांना तर दुसरा डोस ४० नागरिकांना देण्यात आला. यावेळी सरपंच वसंत भोईर, उपसरपंच सूरज कचरे,सदस्य दयाराम भोईर, मृण्मयी बामणे,निलिमा भोईर, आदिती थिटे, पार्वती पवार यांच्यासह दत्ता भोईर, रोहिदास भोईर,दामोदर भोईर,शांताराम आगळे,भरत कान्हेकर,भिकू सुटे, सिताराम भोईर,सहदेव भैईर,विठ्ठल भोईर, नथुराम भोईर,ग्रा.वि.अधिकारी स्नेहा पिंपळकर,आरोग्य सेविका अपर्णाताई,प्रिती मोरे,वेदिका टेंभे, स्वाती ठाकूर,सुप्रिया तुपकर, बेबी बामणे,वनिता शेलार, संगिता टिकोणे, सुशीला कचरे,ग्रा. पं.कर्मचारी आदी सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.
सरपंच वसंत भोईर, उपसरपंच सूरज कचरे यांच्या प्रयत्नातून व प्रा.आरोग्य केंद्र आंबेवाडी यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने राबविण्यात आलेल्या कोरोना लसिकरण मोहिमेबद्दल रहिवासी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.








Be First to Comment