सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले असल्याची घटना घडली आहे, त्या इसमाचा पोलीस शोध घेत आहेत.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी 5-45 वा च्या सुमारास फिर्यादी रा.संजयनगर चाळ वदप ता.कर्जत यांची मुलगी वय-15 वर्षे हि घरातुन काहीएक न सांगता निघुन गेली ती घरी परत आली नाही ती अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील पिडीत मुलगी हिस फिर्यादीचे संमतीशिवाय कायदेशीर रखवालीतुन कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले आहे.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.230/2021 भा.दं.वि.क.363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सोनावणे हे करीत आहेत.








Be First to Comment