Press "Enter" to skip to content

1 लाखाच्या लाचेप्रकरणी दोन वनरक्षकांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वनरक्षक पनवेल रेंज ज्ञानेश्‍वर गायकवाड, वन रक्षक संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन अधिकारी माधुरी पाटील यांना अटक

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

एक लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पनवेल येथील दोन वन रक्षकांवर कारवाई केल्याने वन खात्यामध्ये घबराटीचे वातावरण आहे.

तक्रारदार याचे वडील व काका यांनी तालुक्यातील एका जागेवर दळी भागात नं.4 क्षेत्र 40-10 एकर जमिनीतून 29 गुंठे जागा वन विभाग महाराष्ट्र शासकीय योजनेनुसार शनिवार महादू सपरा यांचेकडून कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घेतलेल्या जमिनीवर कुंपण बांधताना अडथळा न आणण्यासाठी तसेच तक्रारदार यांनी दळी जमीन ही दोघा जणांना विकून त्याची दलाली केली आहे.

त्या जमिनीवर तारेचे कुंपण घालण्याकरिता तसेच जमिनीवरील असलेली झाडे तोडताना कोणतीही कारवाई न करण्याकरिता तीन व्यवहार खरेदीदारांकडून प्रत्येकी 40 हजार रुपये प्रमाणे असे एकूण 1 लाख 20 हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती एक लाख रुपयाची मागणी ठरल्याने त्या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई येथे केल्यानंतर पर्यवेक्षण अधिकारी श्रीमती.ज्योती देशमुख यांच्यासह पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, पो.ह.जाधव, पो.ह.पवार, पो.ना.ताम्हणेकर, पो.ना.पांचाळ, म.पो.ना.बासरे, म.पो.ना.विशे, पो.शि.माने, चव्हाण पो.ह.गायकवाड आदींच्या पथकाने पनवेल परिसरात सापळा रचून लाच स्वीकारणारे ज्ञानेश्‍वर गायकवाड (36 पद वनरक्षक पनवेल रेंज) व माधुरी पाटील (26 वन रक्षक संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पनवेल) यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरोधात भ.प्र.का.सन 1988 (संशोधन 2018) चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.