कोरोना पॉझिटिव्ह नसतांनाही शव कुटूंबियांच्या ताब्यात दिले नसल्याची कुटूंबीयांची तक्रार
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील सोनगाव येथील भास्कर रामचंद्र गोळे यांचे १९जुलै २०२० रोजी उपचारा दरम्यान रोहा उपजिल्हा रुग्णालयात आकस्मित दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ५० वर्षाचे होते त्यांच्या आकस्मित निधनाने गोळे परिवरांवर दुःखाचे डोंगर तर धामणसई परिसरात शोककळा पसरली आहे.
भास्कर गोळे यांची तब्बेत अचानक बिघडली असतांना त्यांना जाधव नर्सिंग होम रोहा येथे त्यांच्या कुटूंबियांनी नेले व डॉ.जाधव यांनी सांगितले की आधी यांची सरकारी दवाखान्यात नेऊन करोनाची टेस्ट करा व नंतरच येथे घेऊन या म्हणून आम्ही त्यांना सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो.नंतर सरकारी डॉक्टरांना कोरोनाची लक्षणेसाठी स्टेटस करण्यासाठी सांगितली
त्यांनी त्यांचा टेम्परेचर व बीपी चेक केला ते सर्व झाल्यानंतर सरकारी संबधित डॉक्टरांनी त्यांच्या कुटूंबियांना धीर देत सांगितले की यांची तब्येत नॉर्मल आहे आता तुम्ही घरी जा म्हणून आम्ही घरी आलो असे भास्कर गोळे यांचे भाऊ यांनी माहिती दिली .
डॉक्टर सांगतात की त्यांची परिस्थिती ही मध्यरात्री ०४ वाजता खालावली व आम्ही त्यांच्या पत्नींना संपर्क साधला परंतु पत्नीचं म्हणणं अस आहे की कोणताही फोन रात्री आला नाही आणि वाजला देखील नाही मला रात्री झोपच लागली नाही फोन डायरेक्ट सकाळी ०७. वाजता दवाखान्यातून फोन आला की तुमच्या पेशंट ची तब्येत गंभीर आहे व इथून लवकरात लवकर दुसरीकडे हलवावे लागेल .तदनंतर पुन्हा ताबडतोब…….०७ वाजता दवाखान्यातुन फोन आला की तुमचा पेशंटची तब्बेत गंभीर आहे. तद्नंतर पुन्हा ताबतोब ७:३५ वा सांगितलं गेल की तुमची केस गेली त्यातच त्यांनी सांगितले की तुम्हाला बॉडी मिळेल. नंतर तब्बल २ तासांनी सांगितले गेले की करोना ची लक्षण आढळून आल्याने तुमच्या हातात बॉडी मिळणार नाही.परंतु कोरोना रिपोट न येता आमची बॉडी आमच्या ताब्यात न देता रोहा येथील वैकुंठ धाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. नंतर त्यांचा रिपोट हा निगेटिव्ह आला.त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.त्यामुळे आमची बॉडी आमच्या ताब्यात न दिल्याने आमच्यावर अन्याय झाला असल्याचे भास्कर गोळे यांचे थोरले बंधू उत्तम गोळे यांनी माहिती दिली आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी,भाऊ व गोळे परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी दि.२८जुलै व उत्तरकार्य विधी दि.३१जुलै २०२० सोनगाव येथे होणार असुन त्याच्या आकस्मित निधनाने त्यांच्या कुटूंबावर दुःखाचे सावट पसरलेले आहे.






Be First to Comment