Press "Enter" to skip to content

बेकायदा खैर तस्करीचा पर्दाफाश, रोहा वनविभागाची धडक कारवाई !

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |

उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनखाली मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा कांबळी, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, वनरक्षक शेणवई तेजस नरे,वनरक्षक मेढा योगेश देशमुख वनरक्षक कुशेडे किशोर वाघमारे, वनपाल माणगांव गायकवाड व राऊंड स्टाफ माणगांव यांनी विघावली फाटा मुंबई गोवा महामार्गावर मोरया धाब्या जवळ टाटा ट्रक क्र. MH.16.Q.7151 तपासले असता त्यामधे अवैध वृक्ष तोडीचा विनापरवाना वाहतूक केलेलं खैर सोलिव माल 9.225 घ.मी. किंमत 15530/- व ट्रक अंदाजे किंमत 5,00,000/- इतके एकूण 5,15,530/- इतका मुद्देमाल व आरोपी उमेश जयसिंग ढवळे रा. बारामती वडगाव निंबाळकर सह जप्त केला.

तसेच आजूबाजूला तपास केला असता कशेणे गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर टाटा एस क्र. MH.06.BG.0089 मागील ताडपत्री उघडून तपासले असता सदर टेम्पोमध्ये खैर सोलीव नग 13 घ.मी. 0.237 किंमत 3374/- रुपये इतका व टेम्पो किंमत 60,000/- असे एकूण 63,374/- इतका मुद्देमाल बेवारस जमा करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.