सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत फ्लॅट च्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.26 ऑगस्टच्या 2021 मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी छोटे वेणगाव येथील वेदांतशी आपार्टमेंट,ए,विंग.पहिला माळा,रुम नं.106 मधील फिर्यादी यांचे रुमचे लोखंडी सेफ्टी दरवाज्याचे लॉक,कडी कोयंडा, तोडुन आत प्रवेश करुन चोरटयाने घरुफोडी चोरी करुन फिर्यादीचे 2 लाख 63 हजार रुपये किमतीचा माल चोरी करुन नेला आहे.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.229/2021 भा.दं.वि.क 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई गावडे हे करीत आहेत.








Be First to Comment