सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रतिनिधी)
मागिल पाच महिन्यांपासून जगात कोरोनाच्या व्हायरसने हाहाकार उडविला आहे. संपूर्ण जग लाॅकडाऊन मध्ये असतांनाच या काळात सुद्धा आपल्या सामाजिक कार्याची जाणीव मनात ठेवून गोरगरीब कष्टकरी अपंग व्यक्तींना तसेच क्रिडा क्षेत्रातील मुलांना नेहमीच सढळ हस्ते मदत करणारे पेण शहरातील सामाजिक व्यक्तिमत्व तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण शहर अध्यक्ष अस्लम नाईक यांचे काल सकाळी पुणे येथील खाजगी रूग्णालयात दु:खद निधन झाले.
या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजते अस्लम नाईक यांच्या निधनाची बातमी पेण शहरात पसरताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन कुटुंबाचे यावेळी सांत्वन केले.






Be First to Comment