नांदेड – वाघाळा महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत कु.श्रद्धा बबनराव उदावंत
सिटी बेल लाइव्ह / हेमकांत सोनार /अलिबाग #
“आँनलाईन गुगल मिट” वेबनार “जन्मबंध व्हाट्सएप” ग्रुपच्या माध्यमातून “स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्र आणि कौतुक सोहळा” चे आयोजन (मुंबई आणि मुंबई परिसर,ठाणे, पालघर, रायगड इ.जिल्हे)आँनलाईन घरी बसून विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करण्यात आले होते.
“आँनलाईन गुगल मिट वेबनार” चे मुख्य आकर्षक होते सुवर्णकार समाजाचे भूषण नांदेड- वाघाळा महानगरपालिकेत ‘सहाय्यक आयुक्त’ आणि ‘उपजिल्हाधिकारी’ या पदावर नियुक्ती झालेल्या “सुवर्ण कन्या कु.श्रद्धा बबनराव उदावंत” यांचे.
कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ध्वनी चित्रफित “देवा तुझा मी सोनार”या गीताने झाली.यानंतर आँनलाईन वेबनार चे प्रास्ताविक “जन्मबंध “चे कार्यकारी अँडमिन सुनील विभांडिक(बदलापूर) यांनी केले.
“जन्मबंध व्हाट्सएप ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर मोरे साहेब यांनी या कार्यक्रमात सुवर्णकन्येचा थोडक्यात परिचय करून दिला.
कु.श्रद्धा बबनराव उदावंत तसेच वडील औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध सराफ व्यापारी (कल्याण ज्वेलर्स,औरंगाबाद) बबनराव उदावंत यांची सुकन्याआहे. त्यांनी औरंगाबाद शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. काँम्पूटरची पदवी संपादन केली.
यानंतर सुनील विभांडिक (बदलापूर) यांनी उपस्थित पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले आणि थोडक्यात सुवर्ण कन्या यांचा शैक्षणिक अल्प परिचय करून दिला.
- महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (एमपीएससी) तीन वेळा परीक्षा दिली.२०१७च्या एमपीएससीच्या परीक्षेत यशस्वी झाल्यामुळे त्यांची नांदेड महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक झाली.
सन२०१९च्या एमपीएससीच्या परीक्षेत कु.श्रध्दा मँडम यांनी नेत्रदीपक यश संपादन करुन महाराष्ट्रात मुलींमधून चौथा क्रमांक तर ओबीसी उमेदवारांमधून द्वितीय क्रमांक मिळवून यशाचे शिखर गाठले .आता त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेली आहे. या त्यांच्या यशामागे त्यांची आई वडीलांचा आशीर्वाद आणि गुरुजन वर्गाचे लाखमोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड-वाघाळा महानगरपालिका चे सहाय्यक आयुक्त ,सुवर्णकन्या कु.श्रद्धा बबनराव उदावंत यांचे मनोगत ऐकण्याची.
कु.श्रद्धा उदावंत मँडम आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या कि,
*स्पर्धा परीक्षा विषयीचे मार्गदर्शन यामध्ये विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
*प्रवेश प्रक्रिया कशी असते?
*अभ्यासक्रमविषयी मार्गदर्शन
*उमेव्दारांची मुलाखत त्याचे कौशल्य.
*अभ्यास किती वेळ करावा?
*स्पर्धा परिक्षेला क्लासेसची गरज आहे का? या अनेक विषयीचे मार्गदर्शन केले.
*शिक्षण फक्त नोकरी व पैसा मिळवण्यासाठी न करता स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी, स्वतःच्या समाधानासाठी करावी.
*अपयशाने खचून न जाता स्वतः पुन्हा प्रयत्न करा, आध्यात्मिक पुस्तके वाचा असा सल्ला समाजबांधवांना दिला.
*आपल्या झालेल्या चूकातून शिकता येते आणि यशस्वी ही होता येते.
*मुळात स्पर्धा परीक्षेत तीव्र स्पर्धा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांने प्लॅन ‘बी”तयार ठेवावा.
*चालू घडामोडींवर नेहमी लक्ष असू द्यावे.
*संदर्भासाठी सोशल मिडियापेक्षा पुस्तकात पहावे.
*अभ्यासात सातत्य असावे. *अभ्यास करतांना होणाऱ्या चुकांवर काम करावे, कमजोर विषयावर जास्त लक्ष द्यावे.
यावेळी त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की, “आपले हात आकाशाला नाही पोहचले तरी चालेल, पण पाय जमिनीला टेकू द्या” हे गौरवोद्गार यावेळी काढले. आपले स्वतःचे पाय जमिनीवर आहे हे त्यांनी सिध्द केले. यावेळी अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा स्विकारल्या.
“जन्मबंधचे ‘कार्यकारी अँडमिन श्री सुनील विभांडिक यांनी कु.श्रद्धा मँडम यांच्या विषयी सांगितले कि,भविष्यात सुध्दा त्यांचा प्रयत्न, चिकाटी,शांत ,स्वभाव, अभ्यासू वृत्ती, या गुणांच्या बळावर व स्वतःची कर्तृत्वाची यशाची उंच शिखरे गाठतील .असा हा यशस्वी तेचा औरंगाबादपासून सुरू झालेला प्रवास यामध्ये बालपण ,शिक्षण ,स्पर्धा परीक्षा,सहाय्यक आयुक्त ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंत करत आपल्या मेहनतीने, चिकाटी, अथांग परिश्रम, जिद्द या जोरावर त्यांनी यशाचा टप्पा गाठला. याचा सर्व सुवर्णकार समाज बांधवांना तसेच आजच्या युवापिढीसाठी आदर्श राहील. तसेच जन्मबंध ग्रुप चे कार्यकारी अँडमिन महेंद्र सोनार (धुळे) यांनी संपूर्ण सुवर्णकार समाज बांधवांतर्फे त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात दिल्या.त्याच प्रमाणे कु. श्रद्धा मॅडम यांच्या वडिलांसह अनेक नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या.
या वेळी महाराष्ट्र मध्यप्रदेश, गुजरात या तिन्ही राज्यातील दोनशेहून अधिक समाज बांधव आप आपल्या घरी बसून वेबनार कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील हिरालाल विभांडिक (बदलापूर)यांनी केले.






Be First to Comment