सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील गोमाशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भूषण भास्कर सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच पदाची निवड ग्रामपंचायत सरपंच पूजा प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडणुकीत भूषण सुतार यांचा एकच अर्ज दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या कोणत्याही सदस्यांनी विरोधी अर्ज दाखल न केल्यामुळे भूषण सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भूषण सुतार हे उच्चशिक्षित तरुण आहेत. ग्रामीण भागातील समस्यांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. कामाची तडफ, दांडगा जनसंपर्क, व प्रशासकीय कामकाजाचे ज्ञान याच्या जोरावर ते गावाचा विकास साधतील याबरोबरच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचे प्रश्न व समस्या अन्य ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहयोगाने ते सोडवतील असा विश्वास व्यक्त होतोय. त्यामुळे त्यांच्या निवडीने सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. शेकापचे जिल्ह्याचे नेते सुरेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली गावाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही यावेळी नवनियुक्त उपसरपंच भूषण सुतार यांनी दिली.
यावेळी माजी सरपंच मुरलीधर सुतार, शरद जगम, बाळा सुतार,राजू कानडे ,बाळू जंगम ,गजाननआप्पा जंगम,देवलिंग जंगम,हरिदास गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, तुळशीराम सुतार, प्रवीण खराडे, महेंद्र जंगम हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.






Be First to Comment