कुत्रा मध्ये आल्याने नियंत्रण सुटले आणि रिक्षा झाडाला जाऊन ठोकली
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रिक्षा समोर अचानक कुत्रा आल्याने कुत्र्याला वाचविण्यासाठी रिक्षा चालकाने अचानक ब्रेक मारल्या मुळे अनियंत्रित रीक्षा झाडाला ठोकून झालेल्या अपघातात नरेश सिमाराम चौधरी वय 52 ,श्रद्धा चौधरी वय 40 ,मंगला मधुकर मनोरे वय 60 वर्षे सर्व रा.वावेघर पो.रसायनी पनवेल हे जखमी झाले.अपघाताची घटना सावरोली गावानजीक घडली.
मिळालेल्या माहितीनुसार नरेश चौधरी हे रिक्षातून पेण बाजूकडून खोपोली कडे येत असताना सावरोली नजीक उतारावर कुत्रा मध्ये आला. कुत्र्याला वाचवण्यासाठी नरेश याने ब्रेक दाबला परंतु वेगात असलेली रिक्षा अनियंत्रित होऊन झाडाला ठोकल्याने अपघातात नरेश गंभीर जखमी झाले. त्यांची पत्नी श्रद्धा आणि सासू मंगला मनोरे किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी एम.जी.एम हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई येथे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे मोटार अपघात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक अमित सावंत हे करीत आहे.








Be First to Comment