Press "Enter" to skip to content

रायगड च्या इतिहासात प्रथमच रायगड महिला क्रिकेट संघाची निवड

अंडर १९ च्या गटात मुलींचे सिलेक्शन : ४ मुलींची महाराष्ट्र कॅम्पसाठी निवड

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रायगड च्या इतिहासात प्रथमच मुलींचं क्रिकेट सिलेक्शन अंडर १९ चा घेण्यात आल. सदर सिलेक्शन हे इनामपुरी खारघर येथे संपन्न झाला या सिलेक्शन साठी एकूण रायगड जिल्ह्यातून २८ मुली आल्या होत्या आणि त्यातून चार मुलींचा सीलेक्शन करून महाराष्ट्र सिलेक्शन कॅम्पसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच रायगड मुलीचा संघ निवडण्यात आले आहे. हे सिलेक्शन करत असताना रायगड जिल्ह्यात प्रथम असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोशियनचे सर्व पालकांनी आणि खेळाडूंनी आभार मानले.

या सिलेक्शन साठी जे सिलेक्टर लाभले होते ते म्हणजे मनीषा अडबळ आणि नीलिमा पाटील, नीलम पाटील ह्या भारत अ संघात खेळलेले आहेत. तर मनीषा पडबळ या महाराष्ट्राच्या चार वर्षे कोच आहेत आणि मुंबईसाठी खेळलेल्या त्यांच्या माध्यमातून आज सिलेक्शन पूर्णत्वास नेण्यात आले. यासाठी महाराष्ट्र रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, जिल्हा सरचिटणीस बहुतुले, स्पर्धा कमिटीचे चेअरमन किरीट पाटील, सिलेक्शन कमिटीचे चेअरमन प्रीतम खैया, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पावसकर,सुयोग चौधरी, संदीप पाटील, सुहास हिरवे, सागर सावंत, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन आजचा हा सिलेक्शन यशस्वी केला.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.